पिंपरी / चिंचवड

भोसरीत राष्ट्रवादीचा प्रचार… प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम!

प्रभाग क्र. ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा वेग, मतदारांशी थेट संवादावर भर

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. प्रभाग क्र. ७ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवला असून, आज भोसरी येथील ग्रामदैवत खंडोबा माळ येथून प्रचाराचा नारळ वाढवून झंझावाती दौऱ्याला सुरुवात केली.

भोसरीतील वसंत फुगे याच्या घरी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी भेट दिली आणि संवाद साधला. ‘प्रामाणिक काम, विकासावर ठाम’ हा नारा देत उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला. घरोघरी जाऊन त्यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत, मतदारांचा विश्वास जिंकण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक संभाजी वसंत फुगे यांच्या निवासस्थानी जाऊन उमेदवारांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. नागरिकांनी आणि महिलांनी उमेदवारांचे उत्साहात स्वागत केले.

हेही वाचा –  प्रभाग ५ मध्ये भाजपा उमेदवारांची विकासाच्या मुद्यांवर प्रचारात आघाडी!

राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रभागातून अनुभवी आणि तरुण चेहऱ्यांची सांगड घालत सक्षम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत: विराज विश्वनाथ लांडे (अ – ओबीसी पुरुष उमेदवार), अनुराधा सुशिल लांडगे (ब – सर्वसाधारण महिला उमेदवार), अश्विनी निलेश फुगे (क – सर्वसाधारण महिला उमेदवार), अमोल मधुकर डोळस (ड – सर्वसाधारण पुरुष उमेदवार),

विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा कौल

प्रचारादरम्यान बोलताना उमेदवारांनी सांगितले की, “आम्ही केवळ आश्वासने देण्यासाठी नाही, तर प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. गेल्या काही वर्षांत केलेली कामे आणि भविष्यातील नियोजित प्रकल्पांच्या जोरावर आम्ही जनतेसमोर जात आहोत.” स्थानिक नागरिकांनीही या पॅनेलला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रभागात परिवर्तनाची लाट स्पष्टपणे दिसून येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button