आजी-आजोबा, नातवंडांमधील प्रेमाचा बंध उलगडला!
गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आजी-आजोबा दिन उत्साहात
![आजी-आजोबा, नातवंडांमधील प्रेमाचा बंध उलगडला!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/SVSPM-Pimpri-Chinchad-780x470.jpg)
पिंपरी : गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आजी आजोबांचे औक्षण करुन पूजन करण्यात आले. शाळेतील बालवाडी विभागातील सर्व शिक्षकांनी छोटे नाटक सादर केले. त्यामधून घरातील वडिलधाऱ्यांचा कसा मान ठेवावा हा संदेश दिला.
यावेळी खास त्यांच्यासाठी गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. ज्यामध्ये सगळ्यांनी गाणे म्हटले व नृत्य सादर करुन मनमुराद आनंद लुटला. या वेळी सेल्फी पॉइंट मुख्य आकर्षण होते. चंद्राची प्रतिकृती करुन त्यामध्ये सगळ्या आजी आजोबांनी नातवंडासोबत फोटो काढले.
यावेळी संस्थेचे संथापक व अध्यक्ष विनायक भोंगाळे, बालवाडी विभागातील वृषाली आहेर, सीबीएसई विभागाच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता शिंदे आदीसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
आजी-आजोबांचे महत्त्व विशद करण्याचा प्रयत्न…
पालक प्रत्येक वेळी आपल्या मुलांसाठी वेळ देऊ शकत नाहीत. अशा वेळी आजी-आजोब त्यांची उणीव भरून काढतात. आई-वडिलांपेक्षाही लहान मुलांना आजी आजोबा जवळचे वाटतात. ते लहान मुलांच्या जडणघडणीत खूप मोठी भूमिका बजावतात. जीवनानुभवातून अनेक गोष्टी मुलांना शिकवतात आणि नातवंडांना जीवनातील महत्त्वाचे धडे देतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी ग्रॅंड पॅरेंट्स डे साजरा केला जातो. आजी-आजोबा आणि नातवंडांमधील प्रेमाचा बंध साजरा केला जातो. या दिवशी मुले आपल्या आजी आजोबांबद्दल प्रेम व्यक्त करतात. त्यांना खुश ठेवण्याचा आणि त्यांच्या आयुष्यातील आजी आजोबांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात. या उद्देशानेच हा उपक्रम घेतल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.