पिंपरी / चिंचवड

सुसगावात ब्लास्टिंगमुळे घर आणि वाहनांच्या काचा फुटल्या

पिंपरी l प्रतिनिधी

सुसगावात एका व्यक्तीने हायगयीने ब्लास्टिंग केले. त्यामुळे मानवी जीवन धोक्यात येऊन घराच्या आणि वाहनाच्या काचा फुटल्या. याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 19) दुपारी साडेचार वाजता घडली.

महेंद्र ससार (रा. सुस, ता. मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हायगयीने सुसगाव येथे ब्लास्टिंग केले. मानवी जीवन धोक्यात येईल, दुखापत होईल इतक्या बेदरकारपणे स्फोट घडवला. यावेळी आरोपीने नागरिकांच्या सुरक्षेचा बंदोबस्त केला नाही. यामुळे फिर्यादी यांच्या सोसायटीतील फ्लॅटच्या काचा फुटल्या तसेच कारच्या काचा फुटून नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button