ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई

भोसरीत बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी नागरिकांना अटक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी पथकाने बनावट कागदपत्रांसह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या ५ जणांना दहशतवाद विरोधी शाखेकडून अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी भागात ही कारवाई करण्यात आली आहे.

यात पोलिसांनी शमीम नुरोल राणा, राज उर्फ सम्राट सदन अधिकारी, जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार, वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीऊल हक हिरा, आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दिन फकीर या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तसंच पोलिसांकडून त्यांना बनावट कागदपत्रं बनवून देणाऱ्या दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या पाच बांगलादेशी नागरिकांकडून अकरा हजार रुपये किमतीचा मोबाईल, एअरटेल कंपनीचं सीम आदी साहित्य जप्त केलं आहे. त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा पारपत्र अधिनियम आणि भारतात प्रवेश करण्याचा नियम यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हे बांगलादेशी नागरिक आहेत. ते भोसरी परिसरात अनेक दिवसांपासून राहत होते. त्यांच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नव्हता. वैध कागदपत्रांशिवाय ते इथे राहत होते. त्यांनी इथे रहाण्यासाठी बेकायदेशीररित्या बनावट भारतीय आधार कार्ड, जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला, तसंच पासपोर्ट बनवून घेतला होता.

पाच बांगलादेशी तरुण अशाप्रकारे भोसरीत राहत असल्याची माहिती दशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी भोसरी परिसरात त्यांच्या ठिकाणावर धाड टाकत ही कारवाई केली आहे. पोलिसांनी घटनस्थळवरून पाच बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button