ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कार्यकाळ संपायला राहिले 10 दिवस; उद्घाटने, भूमिपूजनाचा धडाका

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. कार्यकाळ संपण्यास केवळ दहा दिवस शिल्लक असल्याने सत्ताधारी भाजपने विविध विकास कामाची उद्घाटने, भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. दररोज विविध कामांचे उद्घाटने केली जात आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे महापालिका निवडणूक वेळेत झाली नाही. निवडणूक लांबणीवर गेली आहे. 13 मार्चनंतर महापालिकेवर प्रशासक येणार आहे. त्यामुळे प्रशासकीय राजवट येण्यापूर्वी उद्घाटने, भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. 13 मार्चनंतर प्रशासन आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधी उद्घाटने, भूमिपूजन करतील. त्या अगोदरच उद्घाटने, भूमिपूजन करून भाजपकडून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 30 दापोडी येथे उभारण्यात आलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध उद्यान आणि इतर विकासकामांचा लोकार्पण समारंभ महापौर माई ढोरे यांच्या हस्ते बुधवारी पार पडला. नगरसदस्य रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, आशा शेंडगे, स्वीकृत नगरसेवक संजय कणसे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, अण्णा बोदडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे, शंकर जंजाळे,शेखर काटे, छाया जाधव आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने दापोडी येथे आ. क्र. 3/31 मध्ये 2 हेक्टर जागेमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध उद्यान उभारण्यात आले असून या उद्यानात लॉन, पाथवे, कंपाउंड वॉल, आकर्षक प्रवेशद्वार, लहान मुलांसाठी खेळणी तसेच स्केटिंग रिंग तयार करण्यात आले आहे. या कामासाठी सुमारे 1 कोटी रुपये इतका खर्च झाला आहे.

त्याचप्रमाणे गुलाबनगर परिसरात नवीन दोन मजली व्यायामशाळा विकसित करण्यात आली असून परिसरातील नागरिकांना याचा आरोग्याच्या दृष्टीने उपयोग होणार आहे. या कामासाठी सुमारे 22 लाख रुपये इतका खर्च झाला आहे. याच ठिकाणी दोन मजली नविन समाजमंदिरही बांधण्यात आले आहे. या समाजमंदिराचा उपयोग या भागातील नागरिकांना होणार आहे. या कामासाठी सुमारे 18 लाख रुपये खर्च झाला आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंत्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button