ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जीपॅट परीक्षेत राजमाता महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांचे यश

शिक्षण विश्व : देशपातळीवर मिळवले मानाचे स्थान

पिंपरी-चिंचवड | जीपॅट (GPAT) पदव्युत्तर फार्मसी अभिक्षमता परीक्षा २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या डुडुळगाव शैक्षणिक संकुलातील कॉलेज ऑफ फार्मसीच्या दहा विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत देशपातळीवर मानाचे स्थान प्राप्त केले आहे.

जीपॅट (GPAT) ही एम.फार्मसी प्रवेश, शिष्यवृत्ती आणि संशोधन क्षेत्रातील करिअरसाठी महत्त्वाची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. ओमकार थोरात (GPAT गुण: 224, अखिल भारतीय क्रमांक: 1444), चिन्मयी शिंदे (200, 2692), जानवी उमाप (197, 3219), धीरज जानकर (191, 3796), पार्थ जाधव (188, 4103), श्रुती भुजबळ (179, 5063), तनुजा सोनवणे (178, 5267), श्रिधन रंधवे (168, 6712), अक्षदा शिंदे (161, 7500), आकाश टिळे (144, 12299) यांनी हे यश संपादन केले.

हेही वाचा     :                        चिखलीतील दूषित पाणीप्रश्न गंभीर; नागरिक त्रस्त – प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला 

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल कुंभार, संस्थेचे अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार मा. श्री. विलासराव लांडे, सचिव मा. श्री. सुधीर मुंगसे, विश्वस्त श्री. विक्रांतजी लांडे, खजिनदार श्री. अजित दा. गव्हाणे, व्यवस्थापन प्रतिनिधी प्रा. किरण चौधरी तसेच रजिस्ट्रार सौ. अश्विनी भोसले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. या यशामध्ये जीपॅट (GPAT) परीक्षेच्या इनचार्ज प्रा. शकीला शेख तसेच इतर प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.या यशामुळे महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित झाली असून, येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रेरणादायी ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button