पिंपरी / चिंचवड

पोलिसांना कोयत्याचा धाक दाखवणा-या तडीपार गुंडाला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

तडीपार गुंड त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी शहरात आला. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्याने कोट्याचा धाक दाखवत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार रविवारी (दि. 30) पहाटे सव्वाचार वाजता गोविंद गार्डनजवळ पिंपळे सौदागर येथे घडला.

सलीम पापा शेख (वय 36, रा. पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक श्याम साळुंके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सलीम शेख याला पोलिसांनी सन 2021 मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो जिल्ह्याच्या हद्दीत आला. त्याबाबत त्याने पोलिसांची परवानगी घेतली नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सांगवी पोलीस गेले. त्यावेळी आरोपीने पोलिसांना धक्का मारून निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी अडवले असता आरोपीने पोलिसांना कोयत्याचा धाक दाखवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलीस उपनिरीक्षक काळू शंकर गवारी तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button