पिंपरी / चिंचवड

तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

पिंपरी l प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी शहरात आढळून आला. पोलिसांनी त्याला कोयत्यासह अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 5) दुपारी साडेबारा वाजता पुनावळे येथे जिल्हा परिषद शाळेच्या मागे करण्यात आली.

अमोल उर्फ धन्या गजानन गोरगले (वय 32, रा. पुनावळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अतिक शेख यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन सप्टेंबर 2020 रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन कारवाई केली. पोलिसांना त्याच्याकडे एक कोयता आढळून आला. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अमोल याला अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button