Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

सुश्रुती २०२५ आंतरराष्ट्रीय शल्य–वैद्यक परिषदेची उत्साहात सांगता

शिक्षण विश्व : जागतिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत शल्य प्रशिक्षण सत्रांचा यशस्वी समारोप

पिंपरी चिंचवड: डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद व संशोधन केंद्र आणि NIMA OBGY सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सुश्रुती २०२५’  आंतरराष्ट्रीय शल्य वैद्यक परिषद’ तीन दिवसांच्या शैक्षणिक, संशोधननिष्ठ आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाली. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांचा एकात्मिक दृष्टिकोन मांडत शल्य वैद्यकीय विज्ञानाला नवे दिशा देणारी ही परिषद देशविदेशातील तज्ज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रभावी व्यासपीठ ठरली.

परिषदेचे आयोजन कुलपती डॉ. पी. डी. पाटील, आणि प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव, कुलसचिव डॉ. जे. एस. भवाळकर तसेच NIMA OBGY सोसायटीतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

हेही वाचा –  जंगल सफारी, एडवेंचर गेम मधून विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड प्रशिक्षणाचा अनुभव!

परिषदेच्या उद्देशांसंदर्भात बोलताना डॉ. स्मिता जाधव यांनी वैद्यकशास्त्र आणि प्रगत तंत्रज्ञान यांचा संगम ही भविष्यकालीन आरोग्यसेवेची गरज असल्याचे सांगितले. तर माधुरी मिसाळ यांनी एकात्मिक आणि रुग्णकेंद्री सेवांना गती देण्यासाठी अशा परिषदांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. पी. डी. पाटील यांनी ज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम या त्रिसूत्रीवर आधारित आरोग्यव्यवस्था निर्माण करण्याची विद्यापीठाची बांधिलकी व्यक्त केली.

यावर्षीचा लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार स्त्रीरोग–प्रसूतीशास्त्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रख्यात तज्ज्ञ डॉ. सुधा महादेवकर यांना प्रदान करण्यात आला. ‘बेस्ट आयुर्वेद इन्स्टिट्यूट इनिशिएटिव्ह’ अंतर्गत S.S.A.M. हडपसर (प्रथम), S.D.M. हसन (द्वितीय) आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, धाराशिव (तृतीय) यांचा गौरव करण्यात आला. प्री–कॉन्फरन्स कार्यशाळेला तब्बल 600 नोंदी प्राप्त झाल्या, तर 160 संशोधनपत्रांपैकी 90 सादर करण्यात आली. 11 पोस्टर्स निवडण्यात आले, त्यांपैकी 5 पोस्टर्स वैज्ञानिक चर्चासत्रात महत्त्वाचा भाग ठरले. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. कामिनी धिमान, डॉ. प्रशांत खाडे, डॉ. प्रियांका नाकाडे, डॉ. सुहास हेरलेकर, डॉ. प्रदीप मुसळे, डॉ. स्मृतिका तावरे आणि डॉ. विष्णू बावणे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. समारोप सोहळा ८ प्लेनरी सेशन्स, मेडिको–लीगल नाटिका आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमाने संपन्न झाला. ‘सुश्रुती २०२५’ ने एकात्मिक शल्य–वैद्यकीय विज्ञानासाठी नव्या संशोधन दिशा उघडत यशस्वी नोंद केली.

‘सिझेरियन’ लाइव्ह डेमो ठरले विशेष आकर्षण!

परिषदेतील अटोनिक PPH, Obstetric Suturing, ट्रॉमा–रिपेयर, इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी आणि गर्भसंस्कार अशा शल्य–प्रशिक्षण सत्रांना विद्यार्थ्यांसह तज्ज्ञांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाला. फॉर्सेप्स, व्हॅक्यूम   आणि उच्च जोखीम सिझेरियन सेक्शन प्रक्रियेचे लाइव्ह डेमो विशेष आकर्षण ठरले

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button