Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

जंगल सफारी, एडवेंचर गेम मधून विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड प्रशिक्षणाचा अनुभव!

शिक्षण विश्व: व्ही के माटे हायस्कूलचा स्काऊट गाईड विद्यार्थ्यांना पाचगणी येथे प्रशिक्षण

पिंपरी चिंचवड: चिंचवड येथील मोरया शिक्षण संस्थेच्या व्ही के माटे हायस्कूलमधील स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे मुक्कामी शिबिर पाचगणी भुतेंघर महाबळेश्वर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

प्राचार्या इंद्रायणी माटे पिसोळकर तसेच स्काऊट मास्टर हनुमंत हुचगोळ आणि गाईड कॅप्टन अनिता बोरसे यांच्या संकल्पनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटनावेळी स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण उपमुख्याध्यापक दिलीप कुमावत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्शल कॅडेट फोर्सचे व्यवस्थापक बोराडे आणि सदाशिव जाधव तसेच त्यांचे सहकारी उपमुख्याध्यापक दिलीप कुमावत स्काऊट मास्टर हनुमंत हुचगोळ अनिल तिटकरे गाईड कॅप्टन अनिता बोरसे मनीषा लोहार अपेक्षा गव्हाणे तसेच शिबिर स्थळाच्या इन्चार्ज तेजस्विनी उपस्थित होते.

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना झिप लाईन वॉल क्लाइंबिंग क्राउलिंग बॅलन्सिंग हाय जंप आर्चरी गन शूटिंग सिमेंट ब्लॉक अ‍ॅक्टिव्हिटी टायर्स अ‍ॅक्टिव्हिटीज वॉल जम्पिंग अशा विविध साहसी उपक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आले.

हेही वाचा –  सीमा बदलू शकतात, सिंध पुन्हा भारतात येऊ शकतो; राजनाथ सिंह यांचे मोठे विधान

विद्यार्थ्यांनी घेतला जंगल सफारीचा आनंद

दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना परिसरातील साईट सीन दाखवण्यात आले. त्यानंतर ट्रेकिंग आणि जंगल सफारीच्या माध्यमातून प्रशिक्षण स्थळी विद्यार्थ्यांनी एडवेंचर प्रवास पूर्ण केला. यानंतर रेन डान्स संगीत खुर्ची आणि स्विमिंगचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला.शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांसाठी दोन्ही दिवस चहा नाश्ता तसेच उत्तम दुपारचे आणि रात्रीचे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थी अधिक उत्साही आणि आनंदी दिसत होते. एकूण ११६ विद्यार्थी आणि सहा शिक्षक या शिबिरात सहभागी झाले होते.

कडाक्याच्या थंडीतही विद्यार्थ्यांचा उत्साह

थंडीचा सामना करत विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रम उत्साहात पूर्ण केले. रात्री शेकोटी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्काऊट गाईड विद्यार्थ्यांना तत्काळ विविध विषय देऊन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास सांगण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण करून वेगळा अनुभव घेतला. अत्यंत आनंदी ऊर्जावान आणि प्रसन्न वातावरणात व्ही के माटे हायस्कूलचे स्काऊट गाईड शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button