ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण; 1029 केंद्रांची व्यवस्था

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शका सुचनानुसार रविवारी (दि. 27) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 1029 केंद्र असणार आहेत. याठिकाणी पाच वर्षाखालील लहान मुलांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे.

लसीकरणसाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने आठ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व 60 वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली 220 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे विविध स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रिडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा व इतर स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.

महापालिकेने एकूण 1029 लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. त्यापैकी सर्व मनपा दवाखाने, रुग्णालये, मोठी खाजगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी अशा 916 ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे असणार आहे. तर बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी 30 ट्रान्झिट लसीकरण केंद्रे असतील. वीटभट्टया बांधकामे फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी 76 फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे. मोहिमेचा प्रचार स्लीप वाटप, बॅनर्स, स्टीकर्स, वॉल पेंटींग आदी माध्यमाद्वारे सुरू करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button