ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पीसीएमसी ओपन डेटा चॅलेंज’स्पर्धेत सुजित बाबर, राजवी जगनी प्रथम

हॅकेथॉन, ब्लॉग लेखन आणि डेटा स्टोरीज स्पर्धेत 400 हून अध‍िक स्पर्धकांनी घेतला सहभाग

पिंपरी चिंचवड | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका, स्मार्ट सिटी लि. व पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड इंटरप्राईज विभागाच्या वतीने 17 ते 21 जानेवारी 2022 या कालावधीत “पीसीएमसी ओपन डेटा” सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्त घेण्यात आलेल्या हॅकेथॉन, ब्लॉग लेखन स्पर्धा आणि डेटा स्टोरीज स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये, हॅकेथॉन स्पर्धेत प्रथम – सूरज बाबर, द्वितीय – गौरी मोटवानी, तृतीय क्रमांक (संयुक्त)- शानुकुमार झा, अनिकेत मोरे यांना मिळाला. डेटा स्टोरीज : सुजित बाबर – प्रथम, नव्या नायर – द्वितीय क्रमांक आण‍ि फरझिन मुलाणी, साहिल राजेंद्र पाटील यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकाविला. तर, ब्लॉग लेखन स्पर्धेत : राजवी जगनी – प्रथम, सुधांशू मट्टा – द्वितीय आण‍ि मयूर शिंदे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे परिक्षण पुणे विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून करण्यात आले. सप्ताह दरम्यान, “क्रिएटींग डेटाईझन्स इन्व्होल्वींग पीपल फॉर प्रॉब्लेम सोल्व्हींग”, युज डाटा फॉर सोल्व्हींग सिव्हील प्रॉब्लेम, प्रेडिक्टीशन ऍ़नालॅसीस अँड एमएल, बॅलंन्सींग प्रायव्हसी अँड सेक्युरिटी इन ओपन डाटा, डिजीटल मोनोपॉली या विषयांवर चर्चासत्रे घेण्यात आली होती.

पिंपरी-चिंचवड शहराची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ओळख आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने माहिती तंत्रज्ञानाविषयी विविध उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येतात. ओपन डेटा सर्वांना नि:शुल्क उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र शासनाकडून ‘ओपन डेटा सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये, पिंपरी चिंचवड शहरातील 400 हून अध‍िक स्पर्धकांनी डेटासेट, डेटास्टोरी, ब्लॉग, डेटा हॅकेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून नागरिकांमध्ये ओपन डेटा संदर्भात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

स्मार्ट सिटी ओपन डेटा पोर्टलला समृद्ध करून ज्या शहरांची स्मार्ट सिटी म्हणून निवड झाली आहे, त्यांच्यामार्फत दर्जेदार डेटासेट, डेटास्टोरी, ब्लॉग अपलोड करणे, हा ओपन डेटा सप्ताहाचा उददेश्य होता. त्यानुसार स्मार्ट सिटी लि.च्या मदतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अन्य विभागांनी स्मार्ट सिटीज ओपन डेटा पोर्टलवर डेटासेट अपलोड केले आहेत, ज्याचा शासकीय- निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक किंवा संशोधन संस्था, खाजगी कंपन्या, किंवा महाविद्यालये, शहरातील नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार याचा वापर करण्यास मदत होणार आहे. ओपन डेटा कोणीही ऍक्सेस करु शकतो, वापरु शकतो आणि शेअर देखील करु शकतो, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button