डी वाय पाटील विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे थिंकटेक इंडियामध्ये यश
सीमएड्यूतील १४ विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत संधी

पिंपरी चिंचवड: डॉ. सुशांत पाटील ग्रुपसाठी अभिमानाचा क्षण ठरला असून सीमएड्यू डी.वाय. पाटील विद्यापीठ आंबी आणि सीमएड्यू अजींक्य डी वाय पाटील विद्यापीठ पुणे येथील १४ विद्यार्थ्यांची थिंकटेक इंडिया या नामांकित कंपनीत यशस्वी प्लेसमेंट झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आदित्य सुर्वे ईश्वरी डुंबरे, निखिल मिश्रा, रितेश मांडे, तेजश्री वाघ, अंकित लाल, जिया कुमार, निलाक्षी काळे, रुद्र धोणे, गोपाळसिंग तनवार ,मिथाली सूर्यवंशी, प्रथमेश धागे, सुमित राठी आणि सौरव नायर यांचा समावेश आहे.
बी टेक आयटीडीएस सीटीआयएस आणि एमसीए एआय या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम सातत्य आणि उत्कृष्ट तांत्रिक कौशल्यांच्या बळावर हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशातून संस्थेची भक्कम शैक्षणिक व्यवस्था उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि प्रभावी प्रशिक्षण पद्धती अधोरेखित झाल्या आहेत.
या यशामागे प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाचे मोलाचे योगदान असून विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजांनुसार आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी घेतलेल्या सातत्यपूर्ण उपक्रमांचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे सांगण्यात आले.
हे यश संस्थेचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान डॉ सुशांत पाटील आणि अॅड अनुजा पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शक्य झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी केंद्रित शिक्षणाची परंपरा आणि गुणवत्तेचा दर्जा सातत्याने कायम राहिला आहे.
या यशामुळे डॉ सुशांत पाटील ग्रुप आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ झाले असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. डॉ सुशांत पाटील ग्रुपच्या वतीने सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.





