विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना मिळाले व्यासपीठ
शिक्षण विश्व:न्यू इंग्लिश मीडियम स्कूल थेरगावचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड : न्यू इंग्लिश मीडियम स्कूल थेरगावचा वार्षिक क्रीडा महोत्सव १६ व १७ डिसेंबर रोजी श्री शिवाजी उदय मंडळ तानाजी नगर चिंचवड येथे उत्साहात पार पडला. या क्रीडा महोत्सवाचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिव गोडसे तसेच संस्थेचे अध्यक्ष विजय पवार, सचिव अशोक मोरे, खजिनदार सुरेखा पवार, शशिकांत इंगवले, महादेव जमादार, मुख्याध्यापिका विद्या नाईक आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळांचे महत्त्व तसेच खेळामुळे होणारा शारीरिक व मानसिक विकास याबाबत सविस्तर माहिती दिली. अध्यक्ष विजय पवार यांनी शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा उल्लेख करून सध्याच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा – चंद्रशेखर बावनकुळेंविरोधात असंतोष उफाळला ! राज्यातील महसूल अधिकारी काम बंद करणार

या क्रीडा महोत्सवात लंगडी कबड्डी, खो खो, दोनशे मीटर धावणे, चारशे मीटर रिले, सॅक रेस, थ्री लेग रेस, स्किपिंग अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी करत आपली क्रीडाक्षमता दाखवून दिली.
यावर्षीचा स्कूल कॅप्टन सार्थक झोरे आणि सर्व हाऊस कॅप्टन यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून क्रीडा महोत्सवाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला.
हा क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभ




