विद्यार्थ्यांना घेतला “स्पेस सफर”चा अनुभव!
शिक्षण विश्व्: प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथील उपक्रम

पिंपरी चिंचवड: प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी कॉसमॉस डोम प्लॅनेटेरियम टीम तर्फे “स्पेस का सफर” हा विशेष विज्ञान उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना विश्वातील रहस्यमय आणि आकर्षक जगाची थेट सफर अनुभवता आली.
विद्यार्थ्यांसाठी आवर्जून तयार करण्यात आलेल्या विशेष डोम थिएटरमध्ये विद्यार्थ्यांनी तारे, ग्रह, आकाशगंगा आणि अंतराळातील विविध विस्मयकारक जगाचा अनुभव घेतला. हे सत्र संवादात्मक पद्धतीने, विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत पार पडले.
हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अर्ज मागविले
नर्सरीपासून बारावीपर्यंतच्या एक हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. प्रश्नमंजुषा आणि छोट्या चर्चांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राविषयीची जिज्ञासा आणि विज्ञानाविषयीचा उत्साह अधिक वाढला.
“स्पेस का सफर” या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिकलेल्या विज्ञान विषयक संकल्पना आणि प्रत्यक्ष जीवनातील अंतराळ विज्ञान यांचा सुंदर संगम अनुभवता आला.




