नवी सांगवीत व्यापारी संघटनांकडून कडकडीत बंद
![Strict shutdown by trade associations in Navi Sangweet](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Navi-Sangweet-780x470.jpeg)
साई चौकात राज्यपालांचा जाहीर निषेध
नवी सांगवी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात राजकीय वादंग पेटले आहे. राज्यपालांविरोधात पिंपरी- चिंचवडमध्ये गुरुवारी बंद पुकारण्यात आला. सांगवी, नवी सांगवीतील राजकीय पक्ष, व्यापारी संघटना आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत कडकडीत बंद केला. या बंदमध्ये नवी सांगवीत अत्यावश्यक सेवा मात्र सुरु सुरू ठेवण्यात आले होते. शाळा, दवाखाने, पेट्रोल पंप, आदींबरोबरच सर्व अत्यावश्यक सेवा सुरू होती.
नवी सांगवी येथील साई चौकात नवनाथ जगताप मित्र परिवार, ज्येष्ठ नागरिक संघटना, व्यापारी संघटना मोठ्या संख्येने उपस्थित राहून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी.. जय शिवाजी’, ‘जय..जय.. जय.. जय.. शिवाजी’ आदी नारे देण्यात येत होते.
यावेळी नवी सांगवी येथील साई चौक, फेमस चौक, कृष्णा चौक, भाजी मंडई, क्रांती चौक, एमएस काटे चौक, माहेश्वरी चौक येथील सर्व व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक बंदमध्ये आपली दुकाने बंद ठेऊन बंदला पाठिंबा देण्यात आला.