पिंपरी / चिंचवड

सोन्याचे मणी देत असल्याचे सांगून दिले दगड : महिलेची 81 हजारांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

वृद्ध महिलेची दोन अनोळखी महिलांनी 81 हजारांची फसवणूक केली. वृद्ध महिलेकडील सोन्याचे दागिने घेऊन त्याबदल्यात तिला सोन्याचे मणी देण्याचा बनाव करून तिला सोन्याचे मणी न देता दगड दिले. ही घटना रविवारी (दि. 30) सायंकाळी चार ते पाच वाजताच्या कालावधीत विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर तळेगाव दाभाडे येथे घडली.

सुमन किसन नाणेकर (वय 60, रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी दुपारी तळेगाव दाभाडे येथील आठवडे बाजारात गेल्या होत्या. तिथे त्यांना दोन अनोळखी महिला भेटल्या. त्या महिलांनी फिर्यादीशी गोड बोलून ओळख केली. सोबतच्या वृद्ध महिलेला मदत करण्याचे कारण सांगून फिर्यादीस बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील 81 हजारांचे 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने महिलांनी घेतले. त्याबदल्यात त्यांच्याकडील सोन्याचे मणी फिर्यादीस दिल्याचे सांगून एका कपड्यामध्ये सोन्याच्या मण्याच्या बदल्यात दगड बांधून देत त्यांची फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button