राज्यातील कुस्तीपटूंना आर्थिक सहाय्य करुन मैदाने सुरू करा – महेश लांडगे
![Start the field by providing financial support to the wrestlers in the state - Mahesh Landage](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/mahesh-landage-7.jpg)
पिंपरी चिंचवड | कोरोना काळात राज्यातील कुस्ती आखाडे आणि मैदानांसह भरविण्यात येणाऱ्या स्पर्धा बंद आहेत. त्यामुळे कुस्तीपटूंना आर्थिक फटका बसला आहे. महाराष्ट्राचा गौरव म्हणून ओळखली जाणारी कुस्ती सध्या आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील आखाडे सुरू करावेत. तसेच, कुस्तीपटूंना आर्थिक सहाय्य देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष,आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे सर्वच घटकांतील नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा असलेल्या कुस्तीलाही कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून टाळेबंदीचा सामना करावा लागत आहे. यासह यात्रा, जत्रा, उरुसातील मैदाने रद्द करण्यात आली आहेत. परिणामी, कुस्तीपटू मल्लांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
दुसरीकडे, पंजाब व हरियानासारख्या राज्यांमध्ये कुस्तीची मैदाने आयोजित केली जात आहेत. तसेच, चांगले इमानही ठेवले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मल्लांनी आता उत्तर भारताची वाट धरली आहे, असे चित्र आहे. कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरचे आखाडेही बंद आहेत.राजर्षि शाहु महाराज यांनी जगभरातील मल्लांना राजाश्रय दिला. पण, आता महाराष्ट्रातील खळाडू अक्षरश: निराधार झाले आहेत. पूर्वी उत्तर भारताती मल्ल सरासाठी कोल्हापूरा दाखल होत असत. पण, आत कोल्हापूर सांगली, सोलापूर आणि पणे परिसरातील मल्लांना पंजाब, ह्रियानाची वाट धरावीलागत आहे.