breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दापोडीत अग्निशमन केंद्र उभारण्यास स्थायी समितीची मान्यता

पिंपरी / महाईन्यूज

दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, सांगवी, पिंपळे गुरव या भागात होणा-या आगीच्या घटना टाळण्यासाठी आरक्षण क्रमांक 3/17 या ठिकाणी अग्निशमन केंद्र सुरू करण्याचा ठराव नगरसेवक राजू बनसोडे यांनी स्थायी समिती सभेत मांडला. त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

दापोडी येथे व्यवसाय, उद्योगधंदे वाढले आहेत. लागतच लष्कराचा भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे आहेत. भविष्यात याठिकाणी आगीच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर दापोडीसह, फुगेवाडी, कासारवाडी, सांगवी, पिंपळे गुरव या भागात घडणा-या आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अरक्षण क्रमांक 3/17 या ठिकाणी अग्निशमन केंद्र सूरु करण्याची गरज आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू बनसोडे यांनी ठराव मांडला. त्याला प्रविण भालेकर यांनी अनुमोदन दिले. स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांनी हा ठराव मंजूर केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button