breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विविध विकास कामांच्या 56 कोटी खर्चाला स्थायीची मान्यता

पिंपरी / महाईन्यूज

महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकन आणि ऐनवेळच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे ५६ कोटी ७४ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते. प्रभाग क्र. २३ संदीपनगर, कैलासनगर, गुरूनानकनगर इ. परिसरात स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी २३ लाख रूपये खर्च होतील. प्रभाग क्र. २३ मधील विविध ठिकाणी कलर पेव्हिंग ब्लॉक बसविणे व इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी रूपये २२ लाख खर्च होईल.

प्रभाग क्र. २७ येथे विविध भागात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे व इतर अनुषंगिक कामेकरण्यासाठी २१ लाख रूपये खर्च होणार आहेत. प्रभाग क्र २३ मध्ये पवारनगर. पडवळनगर, ड्रायव्हर कॉलनी, विघ्नहर्ता कॉलनी व इतर भागातनविन कलर पेव्हिंग ब्लॉक बसविणेव इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी २२ लाख रूपये खर्च होतील. प्रभाग क्र. ७ भोसरी परिसरातील स्थापत्य विषयक किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी २१ लाख रूपये खर्च होणार आहेत तर प्रभाग क्र. ७ मधील ड्रेनेज लाईन व चेंबर्सची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने देखभाल व दुरूस्तीची कामे करण्यासाठी २२ लाख रूपये खर्च होईल.

प्रभाग क्र. २३ थेरगाव मधील बापूजीबुवा नगर परिसर, थेरगाव गावठाण परिसर व इतर परिसरातील जलनि:सारण व्यवस्था सुधारणा कामेकरण्यासाठी ३९ लाख रूपये तर मनपा क्षेत्रातील ड व ह क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत असणा-या विविध रस्त्यांवर नामफलक व दिशादर्शक फलक उभारण्यासाठी २ कोटी रूपये खर्च होणार आहेत. प्रभाग क्र. ९ मासुळकर कॉलनी परिसरातील विविध प्रकारची स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी १९ लाख रूपये आणि प्रभाग क्र. ३ च-होली मध्ये स्थापत्य विषयक दुरूस्तीची व देखभालची कामेकरण्यासाठी १८ लाख रूपये खर्च होतील.

मुंबई पुणे रस्त्यावरील सबवे अंडरपास ब्रिज व रस्त्यावरील विद्युत साहित्याची चालन व देखभाल व दुरूस्ती करणे व तद्नुषंगिक कामे करण्यासाठी ५४ लाख रूपये खर्च होणार आहेत. या खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button