ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

क्रीडा शिक्षकांना गैर-क्रीडा कामांमुळे खेळाडुंचे नुकसान

क्रीडा शिक्षकांना अन्य कामे नको : अरुण पाडुळे यांची प्रशासनाकडे मागणी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी 

पिंपरी चिंचवड शहराची ओळख “क्रीडा नगरी” म्हणून निर्माण व्हावी, यासाठी क्रीडा शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असताना त्यांनाच निवडणूक व इतर प्रशासकीय कामांमध्ये गुंतवले जात असल्याने खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा क्रीडा प्रकोष्ट शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांनी क्रीडा शिक्षकांना गैर-क्रीडा कामकाजातून तात्काळ मुक्त करण्याची मागणी केली आहे.

याबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगसेवक कुंदन गायकवाड, नगरसेविका योगीता नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते सचिन सानप उपस्थित होते.

हेही वाचा –  खाण परवानग्यांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना, नियमात आवश्यक ते बदल करण्याचा महसूल विभागाचा निर्णय

पिंपरी चिंचवड हे औद्योगिक नगरी म्हणून देशभर ओळखले जाते; मात्र या शहराची ओळख क्रीडा क्षेत्रातही निर्माण व्हावी, असे अनेक खेळाडूंचे स्वप्न आहे. मात्र सध्या क्रीडा शिक्षकांना निवडणूक तसेच इतर प्रशासकीय जबाबदाऱ्या देण्यात येत असल्याने ते मैदानावर कमी आणि कागदपत्रांच्या कामात अधिक गुंतले जात आहेत. परिणामी, होतकरू खेळाडूंना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शनापासून वंचित राहावे लागत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात अरुण पाडुळे यांनी प्रशासनाला आवाहन करत महानगरपालिकेच्या शाळांमधील क्रीडा शिक्षकांना निवडणूक व इतर गैर-क्रीडा कामकाजातून मुक्त करावे, तसेच शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन क्रीडा शिक्षकांची भरती प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी मागणी केली आहे. “आज ठोस निर्णय घेतला नाही, तर भविष्यातील अनेक राष्ट्रीय खेळाडू घडण्याआधीच थांबतील. खेळाडू घडले तरच शहराचे नाव देश-विदेशात उज्ज्वल होईल,” असे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“क्रीडा शिक्षक हे केवळ शिक्षक नसून ते भविष्यातील राष्ट्रीय खेळाडू घडवणारे शिल्पकार आहेत. त्यांना निवडणूक आणि इतर प्रशासकीय कामांमध्ये अडकवणे म्हणजे खेळाडूंच्या स्वप्नांवर अन्याय करण्यासारखे आहे. जर आपल्याला पिंपरी चिंचवडला खऱ्या अर्थाने ‘क्रीडा नगरी’ बनवायचे असेल, तर क्रीडा शिक्षकांना तात्काळ गैर-क्रीडा कामकाजातून मुक्त करून त्यांना मैदानावर परत आणणे अत्यावश्यक आहे.”

– अरुण पाडुळे, अध्यक्ष, क्रीडा प्रकोष्ट, भाजपा.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button