breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार अमित गोरखे यांच्या बहुजन संवाद यात्रेला महाराष्ट्रभर उस्फूर्त प्रतिसाद

पिंपरी : बहुजन, दलीत समाजाच्या विविध अडचणी जाणून घेण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी आमदार अमित यांनी ५ ऑगस्ट पासून राज्यभर बहुजन संवाद यात्रेला सुरुवात केले आहे. या यात्रेला दलित, बहुजन युवकांचा राज्यभर उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आमदार अमित गोरखे राज्यभर दलित वस्त्या, बौद्ध विहार तसेच अनेक ठिकाणी भेट देत आहेत. त्यांना लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बहुजन संवाद यात्रा महाराष्ट्र दौरा पारनेर दौऱ्या दरम्यान या गावातील मातंग वस्तीत जाऊन भेट दिली व काही विकास कामाचे भूमिपूजन केले. जवळे गाव, गुनोरे गाव, देविभोयरे गाव, अळकुटी गाव, टाकळी ढोकेश्वर गाव आदी गावी अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये भेटी दिल्या.

जालना येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा असे पाचोड रोड अंबड साईबाबा मंदिर येथील मातंग, बौद्ध वस्तीत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्याशी संवाद साधला.वडगाव मावळ येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात उपस्थित राहून तळेगाव, देहूरोड, सुदुंबरे,येथील दलित वस्तीमध्ये भेट दिली.

हेही वाचा    –      नाशिक फाटा ते मोशी अंतरावर तीन ‘जक्शन-सब-वे’

श्रीगोंदा दौरा दरम्यान घोडेगाव दौंड येथे अण्णाभाऊ साठे नगर लोणी व्यंकनाथ, बेलवंडी, पारगाव, कोकणगाव, काष्टी,येथील बहुजन वस्तीमध्ये भेट दिली.नुकत्याच झालेल्या बारामती दौऱ्या दरम्यान भवानी नगर, अण्णाभाऊ साठे नगर कसबा, तांदळवाडी, वडगाव निंबाळकर, येथील मातंग वस्ती, भाजप मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली.

आम्ही खूप मंत्री बघितले, खासदार बघितले, आमदार व नेते बघितले पण आमदार झाल्या झाल्या गावगावात फिरणारा, आमच्यात मिसळणारा, असा आमचाच वाटणारा कार्यक्रता, नेता आमचा माणूस वाटणार आता कोणी तरी आहे अशा भावना काही जेष्ठ दलित नागरिकांनी व्यक्त केल्या.

पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, कळम, धाराशिव येथे उस्फुर्त स्वागत सर्व बहुजन समाजाने केले आहे. ही बहुजन संवाद यात्रा पूर्ण राज्यभर गावगावात, दलित आदिवासी वस्त्यांमध्ये जाणार असून त्यांच्या अडचणी, भावना या उमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांचा पुढे मांडणार असून दलितांना न्याय देण्याचे काम महायुती सरकार करेल असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button