इंद्रायणीनगरमध्ये किल्ले बनवा स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद
310 जणांचा सहभाग; 62 किल्ल्याच्या प्रत्यक्ष दुर्ग प्रतिकृती

पिंपरी | श्री साई चौक मित्र मंडळ आणि विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणीनगर, भोसरी येथील श्री वैष्णोमाता मंदिर प्रांगणात दिपावलीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 310 इतक्या लहानग्यांनी सहभागी होत एकूण 62 वेग वेगळे किल्ल्याच्या प्रत्यक्ष दुर्ग प्रतिकृती बनवल्या. तर, विजेत्या स्पर्धकांचा बक्षिस वितरण समारंभ ही नुकताच पार पडला. तसेच पुढील 7 प्रदर्शन ठेवला होता.
दुर्ग बनवा स्पर्धा १७ ते १९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पार पडली. स्पर्धेचे यंदाचे हे पाचवे वर्षे आहे. स्पर्धेत ५ ते १४ या वयोगटातील मुले सहभागी झाले होते. किल्ला बनविण्यासाठी माती, विट, दगड,पाणी, बारदान, पांढरी व हिरवी रांगोळी, कोळसा पूड आदी सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. स्पर्धेतील पहिल्या पाच किल्ल्याच्या विजेत्या मुलांना रोख रक्कम बक्षीस प्रथम किल्ला राजगड ११,१११, द्वितीय किल्ला प्रतापगड ९,९९९, तृतीय किल्ला शिरगाव ७,७७७, चतुर्थ किल्ला लींगणा ५,५५५, पंचम किल्ला अंकाई ३,३३३तसेच आणखी किल्ल्याच्या विजेत्या परीक्षकांच्या सूचनेनुसार उत्तेजनार्थ म्हणून प्रबळगड , राजमाची गड , केळवे गड, जंजिरा असे पाच किल्याना रोख बक्षीस तसेच प्रत्येकाला ट्रॉफी व टिफीन बॉक्स देऊन गौरविण्यात आले. तर, सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
हेही वाचा : पिंपळे निलख परिसरातील हॉटेलमध्ये अवैध व्यवसायाचा संशय
स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आरएसएसचे प्रांत मंडळ सदस्य विलास लांडगे, टाटा मोटर्स युनियनचे माजी अध्यक्ष तथा कामगार नेते सचिन लांडगे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, चंद्रकांत देशमुख, नेताजी घारे उपस्थितीत पार पडला.
विलास मडिगेरी म्हणाले की, लहानपणीच आपल्या मुलांवर इतिहासाचा संस्कार झाला पाहिजे. या उद्देशाने आम्ही या ठिकाणी मागील चार वर्षांपासून ही स्पर्धा घेत असून यावर्षी हे पाचवे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्याच उत्साहाने असंख्य मावळे यात सहभागी झाले असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच या सहभागी सर्व मुलांना शिवनेरी किल्ल्या भेटीस घेवून जाणार आहे.





