पिंपरी / चिंचवड

प्रेमलोक पार्क येथील आरोग्य शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडी

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडीच्या वतीने लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर चिंचवड पुणे आणि सिद्धिविनायक सामाजिक संस्था प्रेमलोक पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडी चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष संदीप यशवंत शिंदे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक 27, प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे सोमवारी (दि. 28) आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आरोग्य शिबिराचे उदघाटन स्वीकृत नगरसदस्य भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक अॅड. संदीप चिंचवडे, माजी शिक्षण मंडळ सभापती श्रीधर वाल्हेकर, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडी भोसरी विधानसभा उपाध्यक्ष सुरेश झावरे, मानवाधिकार संघटना पुणे जिल्हाध्यक्ष रवींद्र फुलपगारे, पश्चिम महाराष्ट्र रहिवासी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रणजित औटी, सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर डेंगळे, सुमीत बरडीया, डॉ. अरुण शिंदे आदी उपस्थित होते.

आरोग्य तपासणी शिबिरात 358 महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला. नागरिकांनी आपल्या आरोग्य समस्यांचे तज्ञ डॉक्टरांकडून निराकरण केले. शिबिरात स्त्रियांची मोफत पूर्ण शरीर तपासणी करण्यात आली. महिलांना आयुर्वेदिक डॉक्टरांचे सल्ला व मोफत मार्गदर्शन देण्यात आले. उपलब्ध तपासणीवर पन्नास टक्के सूट देऊन हे शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित साळवी यांनी केले. सचिन वाल्हेकर यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button