Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

विद्या व्हॅली नॉर्थ पॉईंट स्कूलमध्ये यशस्वीपणे पार पडली ‘‘स्पेल बी स्पर्धा’’

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग : शब्दसंपत्ती वाढवण्यास झाली मदत

पिंपरी | विद्या व्हॅली नॉर्थ पॉईंट स्कूलमध्ये १४ आणि १५ जुलै २०२५ रोजी स्पेल बी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा शाळेच्या शिक्षिका सौ. प्राजक्ता भिलाये आणि सौ. अबंतिका पाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ही स्पर्धा त्यांच्या शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी, योग्य स्पेलिंग्स शिकण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त ठरली. खेळत-शिकण्याच्या पद्धतीतून विद्यार्थ्यांना एक शिक्षणपर व आनंददायी अनुभव मिळाला.

हेही वाचा     :      अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच!

या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि सर्वांनाच एक समृद्ध आणि रोचक शिक्षणाचा अनुभव घेता आला. संपूर्ण स्पर्धा अत्यंत नेटकेपणाने आणि यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल शाळेतील शिक्षक व आयोजकांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button