ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
दत्त जयंती निमित्त श्री क्षेत्र नारायणपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष यात्रा बस
![Special Yatra bus for devotees going to Shri Kshetra Narayanpur on the occasion of Datta Jayanti](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/PMPML-Bus.jpg)
पुणे | दत्त जयंती निमित्त श्री क्षेत्र नारायणपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष यात्रा बसेसची सोय केली आहे. पीएमपीएमएल कडून 17, 18 व 19 डिसेंबर या तीन दिवसांसाठी 5 विशेष यात्रा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
पीएमपीएमएल च्या सासवड बसस्थानकावरून श्री क्षेत्र नारायणपूर येथे जाण्यासाठी प्रत्येकी 20 मिनिटे वारंवारितेने बसेस उपलब्ध आहेत. सर्व भाविकांनी सदर बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात आले आहे.