breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीतील कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी ‘स्पेशल गिफ्ट’

भोसरी विधानसभा मतदार संघात २५ मोफत बस

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक उपक्रम

पिंपरी । प्रतिनिधी

गौरी-गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील चाकरमान्यांचा उत्साह यंदा द्विगणित होणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या वतीने मोफत बस दिल्या जाणार आहेत. त्यासाठीचे बुकिंग सुरू झाले आहे.

गणेशोत्सव आणि कोकणाचे अनोखं नाते आहे. कोकणी लोकांना गणपती येण्याच्या तीन-चार महिने आधीपासूनच बाप्पाचे वेध लागलेले असतात. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्या फुल्ल असतात. त्यामुळे चाकरमान्यांना खासगी बसनेही प्रवास करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भोसरीतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना खुशखबर दिली आहे. एसटी महामंडळाच्या 25 बस आरक्षित केल्या आहेत. भोसरी मतदार संघातील चाकरमान्यांसाठीच ही सेवा उपलब्ध असणार आहे. भोसरी मतदारसंघातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी जाण्यासाठी 4 सप्टेंबर आणि 5 सप्टेंबर 2024 रोजी एसटी बस सोडण्यात येणार आहेत.

हेही वाचा     –      ‘विनेश फोगट प्रकरणात स्वतः खेळाडू व प्रशिक्षक जबाबदार’; पीटी उषा यांचे विधान 

बुकिंगसाठी ‘या’ क्रमांकावर साधा संपर्क

भोसरीतून गणेशोत्सवासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी मनाली पाताडे 9561431114, विलासभाऊ गवस 90969 00539, सुधाकर धुरी 80876 48484, रुपेश गवस 99222 10905, रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी संदिप साळुंखे 7083890080, सुरज उतेकर 9834558485, सुनील साळुंखे 9922082048, अवधूत कदम 9970535876 आणि रायगड जिल्ह्यात जाण्यासाठी अमित महाडिक 8308250175, रुपेश खेडेकर 8805286512 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत कोकणमधील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. गणेशोत्सव आणि कोकणाचे अनोखं नाते आहे. कोकणात जाण्यासाठी एसटी बस फूल होतात. नागरिकांना कोकणात जाण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे भोसरी मतदारसंघात वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांसाठी बस सुविधा सुरु केली आहे. देव-देश अन्‌ धर्मासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button