Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सोसायटीधारकांचा संताप: कुदळवाडी येथील भंगार दुकाने तात्काळ हटवा!

सोसायटी फेडरेशनची मागणी : महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन

पिंपरी-चिंचवड। प्रतिनिधी

कुदळवाडी परिसरातील सर्व बेकायदेशीर स्क्रॅपची दुकाने, कारखाने, शॉप , गोडाऊन यांच्यावर कारवाई करून ही सर्व या भागातील अनधिकृत गोदामे हटवण्यात यावीत, अशी मागणी चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली आहे.

याबाबत महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कुदळवाडी ,मोशी, चिखली या परिसरामध्ये रहिवासी झोनमध्ये चार ते पाच हजार बेकायदेशीर, अनाधिकृत, कोणतीही परवानगी न घेता स्क्रॅपची दुकान, कारखाने, शॉप, गोडाऊन चालू आहेत. या ठिकाणी अनेक बेकायदेशीर धंदे केले जातात. तसेच या ठिकाणी लोखंड बारीक करणे, प्लास्टिक जाळणे, इतर विघातक ज्वलनशील पदार्थ जाळणे, अशा अनेक गोष्टी घडतात त्यामुळे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण, तसेच नदीच्या कडेला हे व्यवसाय असल्याने जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. या सर्व बेकायदेशीर गोष्टीमुळे या ठिकाणी मागच्या एका वर्षामध्ये 40 वेळा आगीच्या घटना घडलेल्या आहेत. परवाच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आग लागली होती.

हेही वाचा     –        शरद पवार यांच्या वाढदिनानिमित्त राज्यभरात ‘महाआरोग्य अभियान’ 

नागरिकांना सुरक्षीत वातावरण द्या…

याबाबत भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेश लांडगे यांनी देखील महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये आवाज उठवून याकडे माननीय मुख्यमंत्री तसेच सभागृहाचे लक्ष वेधले होते. यावर राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याचे निर्देश आपल्याला दिलेले आहेत. तरी कृपया त्वरित या ठिकाणी असणारी ही सर्व बेकायदेशीर दुकाने कारखाने स्क्रॅपचे गोडाऊन त्याच्यावर कारवाई करून ही या अनाधिकृत भाविक काढून टाकून नागरिकांचे प्रदूषणापासून त्याचप्रमाणे इतर गोष्टीपासून संरक्षण करावे, असेही पत्रात म्हटले आहे.

कारवाई करा अन्यथा आंदोलन…

सोसायटी फेडरेशनकडून आमदार महेश लांडगे, पर्यावरण मंत्री, मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान तसेच आपल्या महानगरपालिकेकडे वारंवार लिखित तक्रारी देखील केलेल्या आहेत. तरीदेखील यावर डोळेझाक करून कोणतीही कारवाई केली जात नाही, ही अतिशय चुकीची आणि गंभीर बाब आहे. महापालिका प्रशासनाने पुढील महिन्याभरात या सर्व बेकायदेशीर गोष्टीवर कारवाई न झाल्यास आमच्या फेडरेशन तर्फे याबाबत लोकशाही मार्गाने आंदोलने व इतर घटनात्मक गोष्टी केल्या जातील याची नोंद घ्यावी, असा इशाराही सोसायटी फेडरेशनने दिला आहे.

कुदळवाडी, मोशी, चिखली या परिसरामध्ये हजारो बेकायदेशीर स्क्रॅपची दुकान, गोडाऊन, शॉप्स आहेत. या ठिकाणी बेकायदेशीरपणे रबर, प्लास्टिक इतर ज्वलनशील पदार्थ जाळले जातात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. तसेच, या ठिकाणी अनेक अनाधिकृत धंदे देखील चालवले जातात याबाबत वारंवार तक्रार करून देखील महानगरपालिका त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नाही. यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अन्यथा फेडरेशन मार्फत खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल.

– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली- मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button