सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा साळुंके यांचा नागरिकांशी थेट संवाद
चऱ्होली वाघेश्वरवाडी परिसरात नागरिकांच्या घेतल्या गाठी भेटी

नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड: चऱ्होली वाघेश्वर वाडी परिसरात सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा दीपक साळुंके यांनी प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधला. या वेळी परिसरातील नागरिकांनी आपल्या दैनंदिन समस्या आणि अपेक्षा मांडल्या.
नागरिकांशी बोलताना अनुराधा साळुंके यांनी सांगितले की, वाघेश्वर वाडी परिसरातील मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. पाणी, रस्ते स्वच्छता, प्रकाश व्यवस्था तसेच इतर नागरी सुविधांनी युक्त असा परिसर विकसित करण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना मिळाले व्यासपीठ
या संवादादरम्यान नागरिकांनी देखील परिसराच्या विकासाबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर ठोस उपाययोजना करण्याची तयारी असल्याने स्थानिक मतदारांकडून अनुराधा साळुंके यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
परिसराचा विकास हेच ध्येय
वाघेश्वर वाडी परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने काम करण्यात येईल असा विश्वास अनुराधा साळुंके यांनी व्यक्त केला.




