TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ‘स्मार्ट सिग्नलिंग’

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य असलेल्या पिंपरी चौकात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. पुणे-मुंबई महामार्ग, महापालिका मुख्यालय, रेल्वे स्थानक, भाजी मंडई, बाजारपेठ अशी प्रमुख ठिकाणे असल्याने हा चौक कायम गजबजलेला असतो. या चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एलईडी सिग्नलद्वारे ‘स्मार्ट सिग्नलिंग’ केली जात आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक (पिंपरी चौक) हा शहरातील मुख्य चौक म्हणून ओळखला जातो. याच चौकात शहरातील प्रत्येक आंदोलने केली जातात. या चौकातून जुना पुणे-मुंबई महामार्ग जातो तसेच पिंपरी मुख्य भाजी मंडई, पिंपरी मुख्य बाजारपेठ, पिंपरी रेल्वे स्थानकाकडे जाणारे मार्ग या चौकातून जातात. महापालिका मुख्यालय या चौकाजवळ असल्याने इथे वाहनांनी वर्दळ, नागरिकांचा राबता कायम या चौकात पाहायला मिळतो. वाहतूक कोंडी, अपघात अशा देखील घटना इथे वारंवार घडतात.

सिग्नल सर्व वाहन चालकांना दिसत नसल्याने अनेक वाहन चालक सिग्नल तोडतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या अशा वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यावर मार्ग काढण्यासाठी सिग्नलवर एलईडी लाईट बसवण्यात आली आहे. ही लाईट सिग्नलच्या दिव्यांसोबत आपले रंग बदलते. सिग्नलच्या खांबावर उभी आणि आडवी लाईट असल्यामुळे किमान 100 मीटर अंतरावरून सिग्नलचा कोणता रंग आहे, हे वाहन चालकांना सहज ओळखता येते.

पुढे बस, ट्रक अशी मोशी वाहने असतील तर त्याच्या मागे असलेल्या लहान वाहनांना रेग्युलर सिग्नल दिसत नाही. एलईडी लाईटचा सिग्नल मोठा असल्याने तो सर्व वाहनांना सहजपणे दिसू शकतो. त्यामुळे आपले वाहन थांबवायचे की पुढे न्यायचे, वाहनाचा वेग कमी करण्याबाबत वाहन चालकांना वेळीच निर्णय घेता येतो.

पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील म्हणाले, पिंपरी चौकात स्मार्ट सिग्नलिंग अंतर्गत एक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मोठ्या एलईडी लाईटमुळे सर्व वाहन चालकांना सिग्नल दिसण्यास मदत होत आहे. याचा वाहतूक सुरळीत ठेवण्यावर सकारात्मक परिणाम होत आहे.

पिंपरी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बनसोडे म्हणाले, स्मार्ट सिटी या अभियानाच्या माध्यमातून हे सिग्नल बसवण्यात आले आहे. सिग्नलचा संपूर्ण खांब एलईडी केला आहे. यामुळे सर्व वाहन चालकांना सिग्नलवरील वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी मदत होत आहे. मेट्रोमार्ग पिंपरी चौकातून गेला आहे. मेट्रोच्या खांबामुळे काही वेळेला काही वाहन चालकांना सिग्नलचे दिवे दिसत नाहीत. मात्र आता एलईडी सिग्नल असल्यामुळे सिग्नल सर्व वाहन चालकांना सहज दिसतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button