शत्रुघ्न काटे स्पोर्टस् अकॅडमीच्या स्केटर्सची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद
![Skaters of Shatrughan Kate Sports Academy entered the Guinness Book of World Records](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/PCMC-780x470.jpg)
पिंपरी | पिंपळे सौदागरच्या शत्रुघ्न (बापु) काटे स्पोर्टस् अकॅडमीच्या स्केटर्सची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. नुकत्याच शिवगंगा रोलर स्केटींग क्लब तर्फे बेळगाव येथे झालेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड १०० मीटर बॅकवर्ड स्केटिंग इन टू व्हील ७५ तास नॉन स्टॉप स्केटिंग, एस. बी. के. स्पोर्ट्स अकॅडमीच्या ६ खेळाडूंनी यशस्वी सहभागी होऊन आपल्या नावावर नवा विक्रम नोंदवला आहे.
स्पर्धेमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणारे खेळाडूचे खालील प्रमाणे..
भार्गवी संजय कलाणे, कैवल्य संजय कलाणे, आराध्या दिलीप उमाप, आर्या मंदार गोखले, गुंजल विक्रांत तेलंग, पार्थ शरद फुलारी या खेळाडूंना नितेश जगताप, सावन गायकवाड, प्रतिक मानकर, निशा मॅडम, सागर भालेराव यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. यासर्वांचे स्वागत एस.बी. के. स्पोर्टस् अकॅडमीचे संचालक व आधारस्तंभ शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते करण्यात आले.