पिंपरी / चिंचवड

सख्या बहिणीला बेदम मारहाण : भावावर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

‘तुझ्या बायकोने मला ती ब्युटी पार्लरचा कोर्स करत असलेल्या मॅडमचा नंबर दिला नाही’ असे बहिणीने म्हटले असता त्यावरून सख्या भावाने बहिणीला बेदम मारहाण केली. तसेच सुरीने जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्री वडमुखवाडी येथे घडली.

प्रतीक प्रकाश तापकीर (रा. च-होली बुद्रुक, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी भावाचे नाव आहे. याप्रकरणी राजलक्ष्मी लक्ष्मण देसाई (वय 35, रा. चिखली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडमुखवाडी येथे हॉटेल आहे. शनिवारी रात्री फिर्यादी, त्यांची आई, भाऊ प्रतीक, भावजय कोमल तुषार तापकीर असे सर्वजण हॉटेलवर होते. ‘तुझ्या बायकोने मला ती ब्युटी पार्लरचा कोर्स करत असलेल्या मॅडमचा नंबर का यादीला नाही’ असे राजलक्ष्मी यांनी भाऊ प्रतीक याला विचारले.

त्यावरून चिढलेल्या प्रतीक याने ‘तू माझ्या बायकोचे नाव घेऊ नको’ असे म्हणत राजलक्ष्मी यांचे केस पकडून त्यांना हॉटेलच्या किचनजवळ नेले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून भिंतीवर जोरात ढकलून दिले. किचन मधील कांदा कापण्याची सूरी घेऊन राजलक्ष्मी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक विद्या माने तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button