Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
धक्कादायक! रावेतमध्ये चौदाव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू…
![Shocking! Worker dies after falling from 14th floor in Ravet ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/death-1-.jpg)
पिंपरी |
रावेतमधील सोनिग्रा अॅण्ड भोसले असोसिएटच्या साईटवरील घटना…
बांधकाम साईटवर चौदाव्या मजल्यावर पडल्याने कामगार गंभीर जखमी झाला आहे. रावेत येथे मस्के वस्ती येथे सुरू असलेल्या सोनिग्रा अॅण्ड भोसले असोसिएट या साईटवर ७ मार्च २०२१ रोजी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. जखमी कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन गोपाळ अलावे (वय १८, रा. रावेत), असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. राम मोहन हांडे (वय ४९, रा. हडपसर, वानवडी), लक्ष्मण गंगाधर मोरे (वय ३०, रा. शिरगाव), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.