ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
घरासमोर वाळत घातलेले कपडे काढताना बसला शॉक; मुलगी जखमी
![Shock while sitting in front of the house taking off the clothes he was drying; The girl was injured](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/electric-cable-shock.jpg)
पिंपरी चिंचवड | घरासमोर वाळत घातलेले कपडे काढत असताना वीजेचा शॉक लागल्याने 13 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. मुलीला उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी (दि. 17) सकाळी भोसरी येथे घडली.अंकिता जयश्री काळे (वय 13, रा. गोडाऊन चौक, भोसरी) असे जखमी मुलीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घरासमोर वाळत घातलेले कपडे काढत होती. त्यावेळी घराजवळ असलेल्या डीपी बॉक्सचा तिला शॉक लागला. यात ती गंभीरपणे भाजली. तिला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.