हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय क्रीडा स्पर्धां
युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव आणि इंद्रायणी महिला प्रतिष्ठान अध्यक्षा निशा यादव यांचा पुढाकार

मार्शल आर्ट्स, कराटे सोबत मल्लखांब, दांडपट्टा, लाठी-काठी पारंपरिक खेळांचा समावेश
पिंपरी चिंचवड: हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनेशभाऊ यादव युवा मंच आणि शेठ माणिकचंद फाउंडेशन यांच्या वतीने संचलित विश्वकल्याण इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव यांनी दिली.
ही स्पर्धा १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजता शनी मंदिर ग्राउंड, पूर्णानगर येथे पार पडणार आहे. या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी मल्लखांब, दंडपट्टा, लाठी-काठी, मार्शल आर्ट्स, फायर जंप, कराटे तसेच विविध पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा – विद्यार्थ्यांना घेतला “स्पेस सफर”चा अनुभव!

या उपक्रमाचे आयोजन इंद्रायणी महिला प्रतिष्ठान अध्यक्षा निशा दिनेश यादवयांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक दिनेश लालचंद यादव आहेत. याबाबत दिनेश यादव म्हणाले, या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि भारतीय पारंपरिक खेळांविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे.
तरुणांनी, खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये भरभरून सहभाग घ्यावा तसेचकार्यक्रमाला परिसरातील नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दिनेश यादव यांनी केले आहे.




