सत्यमेव जयते : बोगस कागदपत्र प्रकरणात राष्ट्रवादीचा माजी महापौर इन‘सिक्युअर’ !
![Satyamev Jayate: Former NCP mayor in 'secure' in bogus document case!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/tusharkamthe-pcmc-bjp.jpg)
- रस्ते सफाईच्या कामातील ‘त्या’कंपनीवर अखेर फौजदारी गुन्हा
- भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांचा भ्रष्टाचारविरोधात यशस्वी लढा
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका अ व ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते सफाईचा ठेका मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे आणि बनावट स्वाक्षरी करुन प्रशासनाची फसणूक केली. तसेच, परफॉरमन्स सिक्युरिटी डिपॉझिट रकमेपोटी सुमारे ७ कोटी रुपयांच्या बनावट बँक गॅरंटी सादर केल्याप्रकरणी मे. सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीवर अखेर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे, रस्ते सफाईच्या कंत्राटाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील माजी महापौराच्या निकटवर्ती व्यक्तीचा सहभाग आहे, असा दावा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केला आहे. त्यामुळे ‘सिक्युअर’ च्या प्रकरणात ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे माजी महापौर इन‘सिक्युअर’ झाले आहेत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
याबाबत महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त यांनी माहिती दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिके तर्फे आरोग्य विभाअंतर्गत अ व व क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील उस्ते गट यांची दैनंदिन साफसफाई करणेकामी निविदा प्रसिध्द करणेत आली होती. त्याअनुगंगाने प्राम लघुत्तम दर निविदा धारक मे. सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा.लि. पुणे यांनी निविदा अटी अतींनुसार महानगरपालिकेस सादर करावयाच्या परफॉरमन्म मिक्युरिटी डिपॉझिट स्कमेपोटी मादर करावयाच्या एकूण रु ६,९०,३१,०००/- एवढया रकमेच्या स्टेट बैंक ऑफ इंडिया एमजी रोड फोर्ट मुंबई गॅरंटी महापालिकम सादर केलेल्या होत्या. तथापि, सदर बँक गॅरंटी या बनावट असलेबाबत तक्रार अर्ज प्राप्त झालेनंतर महानगरपालिकेमार्फत प्रत्यक्ष शहानिशा केली असता सादर केलेल्या बँक गॅरंटी या बनावट असलेने निष्पत्र आहे. सबब में सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा.लि. पुणे यानी सदर प्रकरणी महानगरपालिकेची खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याने त्याने विरोधात पिंपरी पोलिस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सत्यमेव जयते…माझा लढा सुरूच राहील : नगरसेवक तुषार कामठे
सिक्युअर आयटी कंपनीने जमा केलेल्या इएमडी बद्दल मी वारंवार प्रशासनाकडे मागणी करून देखील मला त्या देण्याचे जाणीवपूर्वक टाळले जात होते. कारण, माझा स्पष्ट आरोप आहे की एका माजी महापौरांच्या अकाउंटवरून संबंधित इएमडी जमा झालेले आहे. माझा माननीय आयुक्त व त्यांच्या कार्यपद्धतीवर पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणात प्रशासनाने फौजदारी गुन्हा दाखल केला. याबाबत आता सखोल चौकशी करावी तसेच, सदर प्रकरणआर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवून या प्रकरणाचा खरा सूत्रधार पिंपरी-चिंचवडच्या जनतेसमोर आणावा, अशी माझी अपेक्षा आहे. राजकीय दबाव निर्माण करुन, धाकदडपशाही करुन हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, सत्यमेव जयते… शेवटी सत्याचा विजय झाला. भ्रष्टाचार आणि चुकीच्या कामांविरोधातील माझा लढा यापुढेही सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी दिली.