Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आळंदीत विजया एकादशी निमित्त संतश्रेष्ठ माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट

आळंदी : विजया एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला रंगीबेरंगी आणि आकर्षक फुलांची मनोहारी सजावट करण्यात आली आहे. देशी-विदेशी विविध प्रकारच्या फुलांनी मंदिर परिसर बहरून गेला असून भक्तांना भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव येत आहे.

झेंडू, अष्टर, गोंडा, राजा आदी विविध फुलांचा वापर करून मंदिराला विशेष सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या नक्षीदार आरासेमुळे संपूर्ण मंदिर परिसर अधिकच देखणा आणि आल्हाददायक दिसत आहे. माऊलींचा मुखवटा फुलांच्या हारांनी आणि नव्या वस्त्रांनी सजवण्यात आला असून तो अत्यंत आकर्षक आणि तेजस्वी भासत आहे.

हेही वाचा –  आता ‘NA’ साठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

सकाळपासूनच माऊलींचे हे मनोहारी रूप पाहण्यासाठी भाविकांनी आळंदी नगरीत मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून भाविक भक्तिभावाने दर्शन घेत आहेत. विजया एकादशीच्या निमित्ताने करण्यात आलेली ही फुलांची सजावट भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली असून मंदिर परिसरात सर्वत्र उत्साह आणि भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button