breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये कथित ‘भाई’ कडून हप्तावसुली, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी | पिंपळे गुरव मध्ये पान टपरी वरून हप्ता वसुली करणाऱ्या भाईला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. हप्ता वसुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अखेर या भाईला पोलिसांनी योग्य ती समज देत चक्क माफी मागायला लावली आहे. नकुल उर्फ नक्या गायकवाड असं या हप्ता वसुली करणाऱ्या गुन्हेगाराचे नाव आहे. या घटने प्रकरणी महेंद्र श्याम बहादुर प्रतापसिंह यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपळे गुरव मध्ये हप्ता वसुली करणाऱ्या नक्या गायकवाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला होता. यानंतर सांगवी पोलिसांनी काही वेळातच त्याला अटक केली. पान टपरी चालक महेंद्र हा त्याच्या पान टपरीवर दररोज प्रमाणे सकाळी येऊन व्यवसाय करत होता. तेव्हा, नक्या गायकवाड आणि त्याचा साथीदार त्या ठिकाणी आले. हप्त्याची मागणी करत आधी बरणीने मग, हाताने मारहाण करत शिवीगाळ केली.

हेही वाचा    –      पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा दत्तक देण्यात येणार, केंद्रीय पुरातत्व विभागाची योजना 

पिंपळे गुरव मध्ये माझं नाव कोणालाही विचार अशी धमकी देण्यात आली. हा सर्व व्हिडिओ नक्याच्या साथीदाराने मोबाईल मध्ये कैद केला. तो सोशल मीडियावर व्हायरल केला. अवघ्या काही तासातच या प्रकरणी सांगवी पोलिसांनी नक्या गायकवाडला अटक केली. सांगवी पोलिसांनी त्याची भाईगिरी उतरवली. हात जोडून माफी मागण्यास लावली. मी इथून पुढे काही करत नाही. तुम्ही करू नका अस आता गुन्हेगार नक्या सांगतो आहे. नक्या गायकवाड याच्यावर अल्पवयीन असताना खडकी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button