breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सँडविक कॉलनीतील उद्यान सुशोभिकरणाचा ‘श्रीगणेशा’!

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन

 मतदार संघातील विविध विकासकामांचा शुभारंभ

पिंपरी :  भोसरी विधानसभा मतदार संघातील सोसायटीधारक, सर्वसामान्य नागरिक आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या हिताच्या दृष्टीने पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. सँडविक कॉलनी येथील उद्यानाच्या सुशोभिकरण कामाला सुरूवात झाली आहे, अशी माहिती भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

सँडविक कॉलनी उद्यान सुशोभिकरणाचे काम मार्गी लावण्याबाबत स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका भीमाताई फुगे, माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, माजी नगसेवक सागर गवळी, दत्ता गव्हाणे, कविता भोंगाळे, सम्राट फुगे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, सदगुरूनगर येथे श्रीदत्त मंदिराच्या सभामंडपाचे काम मार्गी लावावे, अशी सूचना स्थानिक नागरिक आणि भाविकांनी केली होती. त्यानुसार सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका सारिका लांडगे, संतोष लांडगे, धनंजय लांडगे, प्रभाकर भिवरे, सुधीर सगेवर, रामदास चव्हाण, आण्णा लडकत, दिलीप कोठावळे, सुधीर थिटे, निलेश सरडे, गणेश उगले, शैलेश जाधव, सचिन चव्हाण, योगेश धादमे, राहुल काटकर, विशाल जैद, नितीन बढेकर, बाळासाहेब थोरात, सुमित थिटे तसेच, सद्गुरु महिला भजनी मंडळ. व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा     –    आरक्षण म्हणजे काय परड्यातली भाजी आहे का? कोणीही उठावे आंदोलन करावे; सदाभाऊ खोत यांचं विधान 

सातेरी देवी मंदिरात सीसीटीव्ही तैनात…

भोसरी विधानसभा मतदार संघातील सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापन प्रणित श्री. सातेरी देवी मंदिर, यमुनानगर, निगडी येथील मंदिर व्यवस्थापन व भाविकांनी सदर मंदिराला सीसीटीव्ही व्यवस्था करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार, सदर यंत्रणा कार्यान्वयीत करण्यात आली. यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. देव-देश अन्‌ धर्मासाठी कटिबद्ध राहुया, असे आवाहन यावेळी आमदार महेश लांडगे यांनी उपस्थितांना केले.

यमुनानगर येथील अंतर्गत रस्ते होणार प्रशस्त…

भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये यमुनानगर स्कीम नं. ५ व ६ मधील अंतर्गत तीन रस्ते काँक्रिटीकण, तुळजा भवानी मंदिर रस्ता (अष्टविनायक मंदिर परिसर) नवीन पेव्हिंग ब्लॉक बसवण्याबाबत स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार, सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी क्रीडा समिती सभापती उत्तम केंदळे, माजी नगरसेविका कमल घोलप, इनामदार सर, श्रीकांत सुतार, भिमाजी पानमंद, प्रशांत बाराथे, रुपल माने, बाबा परब, रवींद्र कुकडे, रमाकांत पाटील, आदित्य कुलकर्णी, गिरीश देशमुख, संकेत चित्ते यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

भोसरी विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाकरिता आम्ही महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांतून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहोत. तसेच, सोसायटीधारक, स्थानिक नागरिक यांना भेडसावणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधांबाबतच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button