breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संभाजी ऐवले यांच्या पदोन्नतीचा विषय मार्गी लावावा, सर्वपक्षिय नगरसेवकांची महासभेत मागणी

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नागरवस्ती विकास योजना विभागाच्या योजना राबविण्याचे उत्तम काम करणारे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांना पदोन्नती देण्याचा विषय आयुक्त राजेश पाटील यांनी मार्गी लावावा, अशी मागणी सर्वपक्षिय नगरसेवकांनी गुरूवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली. ऑनलाईन सभेचा गोंधळ उडाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सभा घेण्यास विरोध दर्शविला होता.

राज्य शासनाच्या आदेशानुसार सभेचे कामकाज ऑनलाईन घेण्यात आले. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांच्या कार्यालयातून सभेला सुरूवात केली. महापालिकेच्या पहिल्याच ऑनलाईन सभेचा बोजवारा उडाला. अनेक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणींमुळे सहभागी होता आले नाही. प्रभारी नगरसचिव चंद्रकांत इंदलकर उपस्थित होते. पालिकेचे पदाधिकारी त्यांच्या कक्षातून, नगरसेवक आपापल्या घरातून तथा कार्यालयातून आणि अधिकारी कामाच्या ठिकाणावरून सभेत सहभागी झाले होते. तासभर चाललेल्या सभेत देहूतील कन्या विद्यालयाला १५ लाख अनुदान देण्याचा विषय दफ्तरी दाखल करण्यात आला. याव्यतिरिक्त सर्व विषय मंजूर करण्यात आले.

नागरवस्ती विकास योजना विभागाचे संभाजी ऐवले हे 31 मे 2021 रोजी निवृत्त होत आहेत. या विभागाद्वारे शंभरहून अधिक कल्याणकारी योजना राबविण्याचे उत्तम कार्य त्यांनी केले आहे. त्याचा शहरातील लाखो नागरिकांना फायदा झाला आहे. अशा योजना राबविण्यात पिंपरी-चिंचवड महापालिका एकमेव महानगरपालिका असून ऐवले यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले आहे. परंतु, त्यांच्या पदोन्नतीचा विषय गेल्या कित्येक वर्षांपासून मार्गी लागलेला नाही. महासभेचे तीन ठराव मंजूर झालेले असताना त्यांना आजतागायत पदोन्नती दिली गेली नाही. जाता जाता त्यांना पदोन्नतीचा लाभ घेता यावा, यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी त्यांच्या पदोन्नतीचा आदेश काढावा, अशा सूचना माजी महापौर मंगला कदम, मनसे गटनेते सचिन चिखले, सीमा सावळे, शिवसेनेचे राहूल कलाटे आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी महापौर माई ढोरे यांना केल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button