पिंपरी-चिंचवडमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय पुण्यतिथीनिमित्त ‘समर्पण दिन’ उत्साहात
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या आदर्श जीवनातून समाजसेवेला प्रेरणा

पिंपरी-चिंचवड: भारतीय जनता पक्षाचे प्रेरणास्थान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी आणि ‘समर्पण दिन’ भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजप कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी आपल्या भाषणात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकला.
भाजपचे शहर उपाध्यक्ष तसेच ज्येष्ठ नेते रवींद्र देशपांडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा खडतर जीवनप्रवास, भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेतील त्यांचे योगदान आणि समाजातील शेवटच्या घटकांसाठी त्यांची असलेली आस्था याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला भाजपचे सरचिटणीस मधुकर बच्चे, वैशालीताई खाडे, नगरसेविका सुप्रियाताई चांदगुडे, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, सीए आघाडी अध्यक्ष बबनराव डांगले, व्यापारी आघाडीचे सतपाल गोयल, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, गणेश वाळुंजकर, सुधीर निर्बीकर, प्रसाद दिवाळीलीकर, प्रकाश सोळंकी, किशोर पवार, अशोक शुभेदार, प्रकाश बंब, रमेश पुजारी, रविंद्र सानप, सुभाष सिंगल, गोविंद सिंदे, अभिजित रॉय, शरद पेद्दी आणि संजय परळीकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर महामंत्री मधुकर बच्चे यांनी केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन आपल्याला शिकवते की समर्पण आणि सेवा याशिवाय समाजात खरी प्रगती साधता येत नाही. आपण सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या आदर्शांचा आचरणात अवलंब केला पाहिजे.”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.




