Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
माजी नगरसेविका पौर्णिमाताई रविंद्र सोनवणे यांचे दुःखद निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Untitled-design-18-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका पौर्णिमाताई रविंद्र सोनवणे (वय-४४) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा असा परिवार आहे.
तळवडे, रुपीनगर भागातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून २०१२ आणि २०१७ मध्ये दोनवेळा पौर्णिमा सोनवणे या महापालिकेवर निवडून आल्या होत्या. स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा – राज्यातील रेशन दुकानदार आजपासून बेमुदत संपावर, मागण्या काय?
अंत्यविधी आज सोमवार दिनांक ०१ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ०१:०० वाजता निगडी स्मशानभूमी, निगडी येथे होईल.