breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

River Cyclothon 2019 : भोसरीतील सायकल रॅलीत तरुणाईचा ‘जल्लोष’

  • सकाळी सहा वाजता रॅलीचे झाले उद्घाटन
  • सायकल रॅलीतून नदी स्वच्छतेचा दिला संदेश

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

इंद्रायणी स्वच्छता अभियान अंतर्गत अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे आणि महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन भोसरी या संस्थांच्या वतीने आयोजित रिव्हर सायक्लोथॉनचे आज रविवारी (दि. 1) सकाळी सहा वाजता भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील पटांगणात महापौर माई ढोरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

पर्यावरण व नदी स्वच्छतेविषयी जनजागृती होण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, माजी महापौर राहूल जाधव, नितीन काळजे, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, उद्योजक कार्तिक लांडगे, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे, कार्याध्यक्ष अशोक माने, सचिव दळवी, नगरसेवक सागर गवळी, दिनेश यादव, अविरत श्रमदानचे दिगंबर जोशी, डॉ. निलेश लोंढे, विश्राम कुलकर्णी, सायकल मित्रचे बाप्पू शिंदे, डॉ. आनंद पिसे, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

आज सकाळी 6 वाजता रॅलीचे उद्‌घाटन झाले. यामध्ये पाच किलोमीटर रॅलीचा मार्ग भोसरी गावजत्रा मैदान पासून सुरू होऊन पुणे नाशिक महामार्गावरून जय गणेश साम्राज्य चौकातून परत गावजत्रा मैदानपर्यंत होता. 10 किलोमीटर रॅलीचा मार्ग भोसरी गावजत्रा मैदान ते नाशिक महामार्गावरून जयगणेश साम्राज्य चौकातून डावीकडे वळून स्पाईन रोडने क्रांती चौकातून परत गावजत्रा मैदानपर्यंत आणि 20 किलोमीटर रॅलीचा मार्ग भोसरी गावजत्रा मैदानपासून नाशिक महामार्गावरून जयगणेश साम्राज्य चौकातून डावीकडे क्रांती चौक, साने चौक, कृष्णा नगर चौकातून परत त्याच मार्गाने भोसरीतील गावजत्रा मैदानावर रॅलीत सहभागी सायकलस्वारांनी सायक्लोथॉनची सांगता केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button