Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

क्रांती दिन सप्ताहातून विद्यार्थ्यांमध्ये जागविली राष्ट्र भक्तीची प्रेरणा

शिक्षण विश्व: संत साई शाळेत क्रांती दिन सप्ताह

पिंपरी चिंचवड | संत साई हायस्कूल भोसरी येथे क्रांती दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले. याच माध्यमातून घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागृत झाली असे शाळेचे मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेश्वर म्हणाले.

संत साई हायस्कूल भोसरी मध्ये गेली 24 वर्ष क्रांती सप्ताह साजरा केला जातो. हे वर्ष संत साई शाळेत कृतज्ञता वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.

यावर्षी क्रांती दिना निमित्त शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची भावना जागविण्या सोबतच त्यांच्या चारित्र्य निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका आहे म्हणून पर्यावरण रक्षकांप्रती विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.निसर्ग संवर्धनासाठी पर्यावरण संरक्षकांची जाणीव या कार्यक्रमातून सर्वांना करून देण्यात आली. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली अनेक निसर्ग रक्षकांबद्दल माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. शाळेचे मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेश्वर व प्रमुख पाहुणे `ग्रीन आर्मी ’चे संस्थापक प्रशांत राऊळ यांच्या हस्ते मशाल पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात झाली.

हेही वाचा    :      पुण्यात भीषण अपघात, टेम्पो दरीत कोसळला; ७ महिला भाविकांचा मृत्यू, २२ जखमी 

पाहुण्यांची ओळख शुभांगी सुतार यांनी करून दिली. सूत्रसंचालन सातवी मधील विद्यार्थिनी अन्वी फुगे आणि आरोही शिंदे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन अन्वी फुगे या विधार्थीनीने केले. या निमित्ताने शाळेत शेतकऱ्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ’शेतकरी गीत’ सादर करण्यात आले.

पर्यावरणावर आधारित ’चिपको आंदोलना ’वर एक नाटिका प्रस्तुत करण्यात आली व ’धरती करे पुकार’ हे पथनाट्यही विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “पर्यावरणाचे संरक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे प्रत्येकाने छोट्या छोट्या गोष्टीतून पर्यावरण संरक्षण करणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षणासाठी आदर्शाचा वारसा पुढे नेण्यासाठी घराघरातून प्रयत्न करणे आवश्यक आहे ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. “असे विचार उपस्थित त्यांनी व्यक्त केले.

संत साई हायस्कूल मध्ये क्रांती दिनानिमित्त या विशेष कार्यक्रमामधून पर्यावरणाबद्दल, निसर्गाबद्दल विविध कार्यक्रम सादर करण्यात आले विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी शपथ घेतली. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक ढवळेश्वर, मुख्याध्यापिका सुनीता ढवळेश्वर, उपमुख्याध्यापिका रूपाली खोल्लम, शाळेच्या विश्वस्त पायल ढवळेश्वर, स्वाती गोसावी, प्रगती कोटूळे, मनोज वाबळे, प्रमोद शिंदे, संजय अनारथे, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button