मिलिंद तेलतुंबडेच्या हत्येचा बदला घेणार, नक्षलवाद्यांन कडून पत्रक जारी
![Revenge for killing of Milind Teltumbde, leaflet issued by Naxalites](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/mumbaitak_2021_11_1c13995a_4495_454a_b6c4_9c75f3bd9de5_Teltumbde.jpg)
पिंपरी चिंचवड | गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत नक्षल कमांडर मिलिंद तेलतुंबडे याच्यासह 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. आता या घटनेवर नक्षलवाद्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नक्षलवाद्यांनी मिलिंद तेलतुंबडेचा उल्लेख ‘जनयोद्धा’ असे करत त्याच्या हत्येचा बदला घेणार असल्याचे पत्रक जारी केले आहे. तसेच नक्षलवाद्यांकडून सहा राज्यात बंदचे आवाहन करण्यात आले आहे.नक्षलवाद्यांनी एक परिपत्रक जारी केले असून त्यामध्ये टॉप नक्षलवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडे याचा उल्लेख ‘जनयोद्धा’ असे करण्यात आला आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीचा केंद्रीय कमिटी प्रवक्ता अभय याच्या नावे हे पत्रक जारी करण्यात आले आहे. यात मृत नक्षल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सभा आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नक्षल्यांचा बंद महाराष्ट्र-छत्तीसगड-ओडिशा-तेलंगणा-आंध्रप्रदेश राज्यात आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पत्रकात मिलिंद तेलतुंबडे यांनी केलेल्या जंगल आणि शहरी क्षेत्रातील नक्षली आंदोलनाच्या विविध टप्प्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. मिलिंद तेलतुंबडे आणि अन्य नक्षली यांच्या मृत्यूने आंदोलनाची मोठी हानी झाल्याचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.