ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

प्युमेरिया ड्राईव्ह मधील नागरिकांचा रक्‍तदानाला प्रतिसाद

लायन्स क्‍लब, डॉ. वैद्य आणि सह्याद्री हॉस्पिटलचा पुढाकार

पिंपरी : रावेत येथील ७ प्युमेरिया ड्राईव्ह सोसायटी मध्ये रक्‍तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लायन्स क्‍लब ऑफ चिंचवड रॉयल, डॉ. वैद्य आणि सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये सोसायटीमधील नागरिकांनी रक्‍तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतली घेतला.

या वेळी ७ प्युमेरिया ड्राईव्ह सोसायटीचे सर्व पदाधिकारी, नागरिक, आयोजक लायन उपेंद्र व वंदना खांबेटे, लायन्स क्‍लबचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष मधुरा बुटाला, सचिव पूजादेवी निखळ, खजिनदार ओंकार पटवर्धन व झोनचे अध्यक्ष लायन प्रीतम दोशी उपस्थित होते.

हेही वाचा – बहारदार गायन व नृत्याने स्वरसागर महोत्सवाची दिमाखदार सांगता

सह्याद्री हॉस्पीटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबीराला मदत केली. या वेळी एंडोर्फिन्सच्या सहकाऱ्यांनी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली. लायन्स क्‍लबच्या वतीने दरवर्षी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि २ ऑक्‍टोबरला शहरातील विविध सोसायट्यांमध्ये रक्तदान शिबीर तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते. नागरिकांचे आरोग्य सदृढ रहावे तसेच रक्‍तदानातून इतरांना मदत व्हावी, या उद्देशाने याचे आयोजन केले जाते. वर्षातून ४ वेळा हे शिबिर आयोजित केले जाते. रक्त तपासणी, महिलांसाठी स्तनांचा कर्करोग तपासणी, उच्च रक्‍तदाब आदीसह विविध आजारांची तपासणी होते. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर रावेत येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले.

लायन्सच्या सेवेचा १ हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाभ

लायन्स क्‍लब ऑफ चिंचवड रॉयल या सेवाभावी संस्थेमार्फत आयोतिज शिबिराचा आतापर्यंत १ जार पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. या सेवेचा फायदा घेऊन वेळीच औषधोपचार करून घेतल्याने नागरिकांचा देखील फायदा झाला आहे. लहान मुलांची नेत्र तपासणी व गरजू मुलांच्या डोळ्यांचे अगदी माफक दरात अथवा अगदी मोफत उपचार करण्यासाठी हा क्‍लब ओळखला जातो. या बरोबरच इंदापूरला कडबनवाडी येथे एक ऑक्‍सिजन पार्क प्रकल्प हाती घेतला असून तिथे १ हजारपेक्षा अधिक झाडांची लागवड करून जोपासना केली जाते, अशी माहिती लायन्स क्‍लबच्या वतीने देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button