स्वातंत्र्य दिनी वीर पत्नींचा सन्मान : सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे यांनी जपले ‘कर्तव्यम’
![Respect for heroic wives on Independence Day: Social activist Santosh Barne celebrates 'Duty'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/santosh-barne-pcmc.jpg)
- शहीद ‘कोरोना योद्ध्यांच्या पत्नींसाठी ‘थीम केक बेकिंग’ स्पर्धा
पिंपरी । प्रतिनिधी
मोशी परिसरातील उद्योजक, युवा सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ बारणे आणि कर्तव्यम सोशल फाउंडेशनच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शहिदांच्या वीर पत्नींचा सन्मान आणि भव्य थीम केक बेकिंग स्पर्धा आयोजित केली आहे.
कोरोना महामारी काळामध्ये सेवा प्रदान करत असताना शहीद झालेल्या पोलीस बांधवांच्या वीर पत्नींचा सन्मान १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मोशी रॉड हॉटेल मोशी येथे होणार आहे.
याप्रसंगी भारतीय सैन्याचे ब्रिगेडियर आर . मोकटोच (विशिष्ठ सेवा पदक), पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी भारत मातेला अनोखी मानवंदना देण्याच्या उद्देशाने दिनांक 16 आणि 17 ऑगस्ट रोजी थीम केक बेकिंग या अनोख्या “बेक द केक” स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोरोना कालावधीमध्ये लॉकडाऊन मुळे खचून न जाता मनाला उभारी देण्याच्या उद्देशाने अनेक महिला भगिनीनी केक बनवण्याचा उद जोपासला होता. या हौशी कलावताना व्यासपीठ उभे करून देण्याची या स्पर्धेमागची भूमिका आहे.
या तीन स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 10000 , द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 7000 , तृतीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 5000 देण्यात येणार आहे. तसेच सर्व स्पर्धकांचे केक दिनांक 16 आणि 17 ऑगस्ट रोजी “मोशी ग्रँड होटल” येथे घेतले जातील. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करत प्रत्यक्षरीत्या प्रदर्शित केले जाणार आहेत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहीद वीरांच्या पत्नींचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मिळणार आहे. त्याचबरोबर समाजातील महिलांना स्वतःमधील कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भाग्य आम्हाला लाभणार आहे अशी भावना उद्योजक संतोष बारणे यांनी यावेळी बोलताना केली.