पिंपरी / चिंचवड

चिखली घरकुलमधील ६,७०० कुटुंबांना दिलासा

मिशन- PCMC: मालमत्ता कर माफीचे आमदार महेश लांडगे यांचे आश्वासन

पिंपरी-चिंचवड : चिखली येथील घरकुल प्रकल्पातील तब्बल ६,७०० कुटुंबांचा मालमत्ता कर माफ करण्यात येणार असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे जाहीर आश्वासन दिले आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. भाजप उमेदवार निलेश नेवाळे, कुंदन गायकवाड, योगिता नागरगोजे आणि रिटा सानप यांच्या प्रचारार्थ चिखली घरकुल येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

आमदार लांडगे म्हणाले की, घरकुल प्रकल्पातील नागरिकांच्या अडचणी आणि व्यथा लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशनात मालमत्ता कर माफीचा मुद्दा शासनदरबारी मांडण्यात आला होता. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या मागणीला यश आले असून, घरकुलमधील हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विरोधकांच्या कार्यकाळात घरकुल योजना राबवताना अनेक त्रुटी राहिल्या. त्या दुरुस्त करण्याचे काम भाजप सरकार सातत्याने करत असल्याचे सांगत, शास्ती करासारख्या जाचक निर्णयातून नागरिकांची मुक्तता केल्याचे लांडगे यांनी नमूद केले. घरकुलमधील इमारतींना ब्लॉक बसवणे, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे यासारख्या उपक्रमांतून रहिवाशांच्या सुविधांना प्राधान्य देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या तिकिटांची किंमत वाढली, आरक्षण प्रणालीतही बदल

“भाजप केवळ विकासाचे राजकारण करते. विनाकारण टीका-टिप्पणी करण्यापेक्षा कामातून उत्तर देण्यावर आमचा भर आहे. मात्र, आमच्या संयमाचा कोणी गैरफायदा घेतला, तर त्याला योग्य उत्तर देण्याची ताकद आमच्यात आहे,” असा इशाराही आमदार लांडगे यांनी दिला. प्रभागाचा सर्वांगीण विकास हवा असेल, तर सुज्ञ नागरिकांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आमदार अमित गोरखे यांनीही मनोगत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार प्रभाग ११ मध्ये हजारो नागरिकांना हक्काची घरे मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. चिखली परिसराचा कायापालट करण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी महेश लांडगे यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे नमूद करत, येत्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले. या सभेला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि घरकुल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मालमत्ता कर माफीच्या घोषणेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button