Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या तिकिटांची किंमत वाढली, आरक्षण प्रणालीतही बदल

Fare structure of Vande Bharat sleeper trains : वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसच्या तिकिट दरांत आणि आरक्षणांत किंचित बदल करण्यात आले आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या तिकिटांची किंमत राजधानी एक्स्प्रेससारख्या सध्याच्या प्रीमिअम ट्रेनपेक्षा थोडी जास्त असणार आहे. तसंच, किमान भाडं ४०० किमी अंतरासाठी आकारले जाणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गुवाहाटी-हावडा मार्गावर पहिल्या ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात होणार आहे. या ट्रेनमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तीन तास वाचणार आहेत.

हेही वाचा –  काँग्रेसचा आरोप अन् राज्य निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला थेट सवाल; दिला ‘हा’ आदेश

“किमान शुल्क आकारले जाणारे अंतर ४०० किमी असेल. या ट्रेनसाठी केवळ १०० टक्के आरक्षण तिकिटे विकले जातील. आरएसी, प्रतीक्षा यादी आणि अंशतः आरक्षित तिकिटांची तरतूद नसणार. सर्व उपलब्ध बर्थ अॅडवान्स रिझर्वेशन कालावधीच्या दिवसापासून उपलब्ध असतील”, असं रेल्वे बोर्डाने ९ जानेवारी रोजी जारी केलेल्या परिपत्रकांत म्हटलं आहे.

इतर एक्सप्रेस गाड्यांच्या एसी क्लासमध्ये प्रतीक्षा यादीतील तिकिटे स्वीकारली जात नाहीत आणि आपोआप रद्द केली जातात, परंतु पुष्टी न झाल्यास आरएसी तिकिटे नियमितपणे दिली जातात. आरएसी अंतर्गत, दोन प्रवाशांना एका बाजूला खालचा बर्थ शेअर करण्याची परवानगी आहे. इतर गाड्यांप्रमाणे, वंदे भारत स्लीपरमध्ये महिला, अपंग व्यक्ती (पीडब्ल्यूडी) आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कोटा असेल आणि कर्मचाऱ्यांसाठी ड्युटी पास कोटा असेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button