पिंपरी / चिंचवड
जुनी सांगवी येथे भावकीतील तरुणीवर बलात्कार
पिंपरी l प्रतिनिधी
जुनी सांगवी येथे भावकीतील तरुणीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक प्रकार ऑगस्ट २०२१ ते ११ मे २०२२ या कालावधीत घडला आहे.
पीडित २० वर्षीय तरुणीच्या फिर्यादीनुसार २२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि पीडित तरुणी हे भावकीतील आहेत. त्यामुळे नात्याने ते भाऊ-बहीण लागतात. मागील तीन महिन्यांपासून ते जुनी सांगवी येथे ते एकत्र राहत होते. आरोपीने तरुणीसोबत जबरदस्ती केली. तिच्यासोबत फोटो काढून तिचा विनयभंग केला. तसेच तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.